Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

काय सांगशील ज्ञानदा

कालच सांगत होती मंदा कधी नाही ते आमचे हे एबीपी माझा लावून बसतात यंदा काय सांगशील ज्ञानदा सारी दुनिया झाली एबीपी माझा ची फिदा लोकमत, साम, २४तास सर्वांचाच खचून गेलाय धंदा काय सांगशील ज्ञानदा फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर सुद्धा एकच उठून दिसतेय सदा सर्वदा काय सांगशील ज्ञानदा सगळ्यात महत्त्वाचं👇 जोक मिम्स करताना आपली पातळी मात्र ओलांडू नका महाराजांच्या स्त्रीसन्मानाच्या शिकवणीचा विसर पडू देऊ नका वाटल्यास जिओ टीव्ही वर बघा तोच कार्यक्रम पुन्हा एकदा काय सांगशील ज्ञानदा

कोरोनाला लढा

दिवस कुठे चांगले चालले होते, त्यात तुझी ही भर पडली । कोण जाणे कोणाची ही पीडा आली, जी तुझी लागण आमच्या देशाला झाली ।। नक्की कोणत्या दैत्याचं रूप तुझं, ज्याने उडविली आमच्या गालावरची खळी । मी तर म्हणतो त्या दैत्याहुनी महाक्रूर तू, जिथे जन्मला तिथेच घेतले ३० हजार बळी ।। तसं आम्हाला इतिहासच लाभलाय शूरवीरांचा, म्हणून तुझा सर्वात उत्तम मुकाबला तर आम्हीच केला । इतक्या तावातावाने चवताळून आलास खरा, पण आम्ही तर तुझ्या क्रूरपणाचाही फायदा घेतला ।। आमच्यावर हसणारी ती फॉरेनर लोकं, आज पुन्हा राम राम करू लागली। तुझ्या ह्या क्रूरपणामुळेच आज, आमची संस्कृती जगभरात पोहोचू लागली।। अरे ३३ कोटी देवांची भूमी आहे ही, इथे तुझं वर्चस्व फार वेळ नाही टिकणार । मास्क, सॅनिटाईझर आणि कर्फ्युला सोबत घेऊन, आम्ही सुरक्षितपणे तुझ्याशी लढत राहणार ।।

कोल्हापूर महापूर

बाकी काही मागणं नाही देवा येशील तेंव्हा सर्वप्रथम कोल्हापुरात पदार्पण कर, माझ्या कोल्हापूरच्या बांधवांवर कृपावृष्टी करून त्यांचा भार हलका कर। सर्वांच्या घरी सारखाच नटून थटून तू येतोस खरा, पण यावर्षी सर्वात आधी त्यांच्या मनोकामना पूर्ण कर। मला माहित आहे देवा जसा भाव तसा तुझी कृपा आहे, पण भक्ताचं काही चुकलं असेल तरी त्यांना तू माफ कर। रोज त्यांच्या यातना बघून जीव कासावीस होतोय सर्वांचा, करुणामय आहेस तू तर माझ्या बांधवांवरसुद्धा करुणा कर। मान्य आहे मला देवा तुझ्याकडून जरा जास्तच अपेक्षा ठेवत आहे, पण बाकी काही मागणं नाही देवा येशील तेंव्हा सर्वप्रथम कोल्हापुरात पदार्पण कर, माझ्या कोल्हापूरच्या बांधवांवर कृपावृष्टी करून त्यांचा भार हलका कर।

बदलते आयुष्य

आयुष्य फार छोटं आहे, सकाळचा चहा दोन वेळचं जेवण आणि रात्रीची झोप एवढंच आहे. दिवसामागून दिवस ढकलले जातात, लहानपणी ज्या मातीत खेळलो त्या मातीत आज पाय घाण होतात. लहानपणी जे दिवस चिमण्यामध्ये घालवले तेच आज देखील जातात, पण आज त्या चिमण्या twitter या टोपणनावाने ओळखल्या जातात. कामकाजाच बोलाल तर बाकी सर्व ठीक आहे, फक्त लहानपणी ज्या बोटांनी पेन पकडलं तीच बोट आज कीबोर्ड सोबत busy आहेत. लहानपणी आपल्या आवडत्या बेंच वर बसण्यासाठी जो गडबड गोंधळ करायचो तो आजही चालतो, फक्त फरक केवळ शाळेच्या बेंचऐवजी ट्रेन च्या सीट वर दिसून येतो. कळत सुद्धा नाही कधी धगधगत्या जीवनात आपण लहानाचे मोठे होऊन जातो, सत्य तर हेच आहे की या आयुष्याच्या जंगलात आपण स्वतःच हरवून बसलेलो असतो.

बाप आणि पोराचं नातं

आमचं बाप आणि पोराचं नातंच असं वेगळंच असतं... आमचं बाप आणि पोराचं नातंच असं वेगळंच असतं। कोणाला सहजासहजी समजण्याच्या पलीकडचंच असतं।। आयुष्यात कधीच एकमेकांचं पटत नसतं। पण एकमेकांशिवाय मन मात्र रमत नसतं।। भांडल्याशिवाय दिवस सुरू झाला असं वाटतच नसतं। एकदाचं भांडून झालं की मन प्रसन्न झाल्यासारखं वाटू लागतं।। चार आण्याची लायकी काढून झाल्यावर त्यांचं मन भरून जातं। आणि प्रत्त्युत्तरात त्यांचे दुर्गुण काढले नाही तर माझं मन अपूर्ण राहतं।। मनात एकमेकांबद्दल आदर असूनही  समोरासमोर दाखवायचं नसतं। पण बाहेर मात्र एकमेकांचा आदर्श ठेवून ताठ मानेने जगायचं असतं।। इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना स्वतःच्या गरजांना सुळावर चढवावं लागतं। आणि ह्या कर्तव्याची परतफेड करण्यासाठी मलासुद्धा झटावं लागतं।। एकमेकांसमोर एकमेकांची निंदा करण्यातच आमचं जीवन सारं व्यर्थ जातं। मध्येच "उद्या जर निंदा करायला चेहरा हा दिसेनासा झाला तर" या विचाराने एकमेकांचं काळीज मात्र धडकत राहतं।। अरे आमचं बाप आणि पोराचं नातंच असं वेगळंच असतं। कोणाला सहजासहजी समजण्याच्या पलीकडचंच असतं।।

For आई❤️

नाव : अंकित वय  : २१ वर्ष तुझ्यासोबत तुलना करण्याइतकी पात्रता अजून माझ्यात आलेली नाही. तरी तुझ्या असंख्य गुणांच्या खाणीमधून तू मला अर्पण केलेल्या काही गुणांच्या मदतीने तुझ्यासमोर काहीतरी सादर करण्याचा छोटासा प्रयत्न : चार महिन्यांचा होतो मी, जेव्हा ह्या बाहेरच्या जगाची मला कल्पना देखील नव्हती, तुझ्या पोटाचा हा भला मोठा गाभारा हीच माझी दुनिया होती ।। नंतर नऊ महिन्याचा झालो, जेव्हा पहिल्यांदाच या जगात प्रवेश केला, आल्या आल्याच एकदम रडू कोसळलो, कारण तुझा सहवास थोडा दुरावला गेला ।। चंद्रासारखी हळू हळू होणारी वाढ माझी, आता पहिल्या वाढदिवसावर येऊन थबकली होती, आता १० ग्रुप जरी साजरे करत असले, तरी तेव्हा वाढदिवसाची पहिली ओळख मात्र तूच करून दिली होती ।। पुढे पाच वर्षांचा झालो, जेव्हा पहिल्यांदा रडत रडत शाळेत गेलो, तुझ्या कुशीत वसलेल्या माझ्या त्या गावापासून प्रथमच इतका वेळ लांब गेलो ।। जसजसा शाळेत रमू लागलो तसतसा मित्र परिवार वाढू लागला, कळत नकळत का होईना पण हळू हळू तुझा विसर पडू लागला ।। पंधराव्या वर्षी दहावी आली, मी लावलेले दिवे पाहून तुझाच दिवा पेटत नव्हता, माझ...