Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

समदं काही ठाव हाय तरी घरी बसायचं नाव न्हाय

समदं काही ठाव हाय तरी घरी बसायचं नाव न्हाय ।। धृ ।। मोठालं संकट आलंय दारी देवा तूच आता यातून तारी करी किरपा त्यांच्या बुद्धीवरी ज्यांना बाहेर पडायची खाज हाय ।। १।। डाक्टर लढत हायत उपचार करूनि पोलीस बी हायत उभे काठ्या रोखुनि तरी कशापाय फिरता इतका हट्ट धरूनि समदं तुमच्याच रक्षनासाठी चाललेलं हाय ।। २ ।। सरकारनं लोकडाऊन वाढवला हाय रोग जिकडं तिकडं पसरतो हाय आकडा बी दिसनदिस वाढतो हाय पन तुम्हांसनी घरी बसाया जमत न्हाय ।। ३ ।। जीवाची पर्वा कदाचित नसल तुम्हांसनी पन कुटुंबाचा जीव टांगणीला लावूनी नका भटकू बाहेर असं खुळ्यावानी अजून बी येळ गेलेली न्हाय ।। ४ ।। #घरी_रहा #सुरक्षित_रहा 🙏🙏

रोजच्या ह्या धगधगत्या जीवनाचक्रात माझी शाळा मला आठवत नाही...

१५ जून २००४ - शाळेचा तो पहिला दिवस... इतरांसारखाच मी देखील पहिल्यांदा रडत रडतच शाळेत पोहोचलो आईच्या पदराने नाक डोळे पुसत शाळेच्या बाकावर जाऊन बसलो पण कोण जाणे शाळेच्या त्या बाकाची जादूच काही निराळी होती जणू त्या बाकाने पुढची १० वर्षांची गाठ तेंव्हाच हळूच बांधली होती शाळेतल्या त्या ठरलेल्या बाकावरील गोंधळ आज देखील पाहायला मिळतो फक्त फरक मात्र त्या बकाऐवजी आज ट्रेनच्या सीटवर दिसून येतो ट्रेनच्या खिडकीबाहेरचा निसर्ग बघण्यास देखील आता मला सवड नाही रोजच्या ह्या धगधगत्या जीवनचक्रात माझी शाळा मला आठवत नाही. हळू हळू शिक्षकांचे धपाटे खात थोडा मोठा झालो गुडघ्यापर्यंतच्या त्या हाफ चड्डीतून आता मात्र फुलपँटीत आलो फुलपँटीत आल्याबरोबर हळूच शिंग देखील फुटू लागली मित्र मैत्रिणी सवंगाड्यांसोबत आता एक गिर्लफ्रेंडसुद्धा सोबत आली तिला गुपचूप लिहायची ती पत्र तर मी आज देखील रोज लिहितो फक्त आज ते ऑफिसच्या कामासाठी ई-मेल वरून क्लायंटला पाठवतो  आता ऑफिस आणि डेली रुटीन ह्यापलीकडे दुसरं काही दिसत नाही रोजच्या ह्या धगधगत्या जीवनचक्रात माझी शाळा मला आठवत नाही. बघता बघता दहा वर्षांची ही टूर आता संपत आली उगवलेली...