Skip to main content

काय सांगशील ज्ञानदा

कालच सांगत होती मंदा
कधी नाही ते आमचे हे एबीपी माझा लावून बसतात यंदा
काय सांगशील ज्ञानदा

सारी दुनिया झाली एबीपी माझा ची फिदा
लोकमत, साम, २४तास सर्वांचाच खचून गेलाय धंदा
काय सांगशील ज्ञानदा

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर सुद्धा
एकच उठून दिसतेय सदा सर्वदा
काय सांगशील ज्ञानदा

सगळ्यात महत्त्वाचं👇

जोक मिम्स करताना आपली पातळी मात्र ओलांडू नका
महाराजांच्या स्त्रीसन्मानाच्या शिकवणीचा विसर पडू देऊ नका
वाटल्यास जिओ टीव्ही वर बघा तोच कार्यक्रम पुन्हा एकदा
काय सांगशील ज्ञानदा

Comments

Popular posts from this blog

बाप आणि पोराचं नातं

आमचं बाप आणि पोराचं नातंच असं वेगळंच असतं... आमचं बाप आणि पोराचं नातंच असं वेगळंच असतं। कोणाला सहजासहजी समजण्याच्या पलीकडचंच असतं।। आयुष्यात कधीच एकमेकांचं पटत नसतं। पण एकमेकांशिवाय मन मात्र रमत नसतं।। भांडल्याशिवाय दिवस सुरू झाला असं वाटतच नसतं। एकदाचं भांडून झालं की मन प्रसन्न झाल्यासारखं वाटू लागतं।। चार आण्याची लायकी काढून झाल्यावर त्यांचं मन भरून जातं। आणि प्रत्त्युत्तरात त्यांचे दुर्गुण काढले नाही तर माझं मन अपूर्ण राहतं।। मनात एकमेकांबद्दल आदर असूनही  समोरासमोर दाखवायचं नसतं। पण बाहेर मात्र एकमेकांचा आदर्श ठेवून ताठ मानेने जगायचं असतं।। इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना स्वतःच्या गरजांना सुळावर चढवावं लागतं। आणि ह्या कर्तव्याची परतफेड करण्यासाठी मलासुद्धा झटावं लागतं।। एकमेकांसमोर एकमेकांची निंदा करण्यातच आमचं जीवन सारं व्यर्थ जातं। मध्येच "उद्या जर निंदा करायला चेहरा हा दिसेनासा झाला तर" या विचाराने एकमेकांचं काळीज मात्र धडकत राहतं।। अरे आमचं बाप आणि पोराचं नातंच असं वेगळंच असतं। कोणाला सहजासहजी समजण्याच्या पलीकडचंच असतं।।

समदं काही ठाव हाय तरी घरी बसायचं नाव न्हाय

समदं काही ठाव हाय तरी घरी बसायचं नाव न्हाय ।। धृ ।। मोठालं संकट आलंय दारी देवा तूच आता यातून तारी करी किरपा त्यांच्या बुद्धीवरी ज्यांना बाहेर पडायची खाज हाय ।। १।। डाक्टर लढत हायत उपचार करूनि पोलीस बी हायत उभे काठ्या रोखुनि तरी कशापाय फिरता इतका हट्ट धरूनि समदं तुमच्याच रक्षनासाठी चाललेलं हाय ।। २ ।। सरकारनं लोकडाऊन वाढवला हाय रोग जिकडं तिकडं पसरतो हाय आकडा बी दिसनदिस वाढतो हाय पन तुम्हांसनी घरी बसाया जमत न्हाय ।। ३ ।। जीवाची पर्वा कदाचित नसल तुम्हांसनी पन कुटुंबाचा जीव टांगणीला लावूनी नका भटकू बाहेर असं खुळ्यावानी अजून बी येळ गेलेली न्हाय ।। ४ ।। #घरी_रहा #सुरक्षित_रहा 🙏🙏