माझ्या कोल्हापूरच्या बांधवांवर कृपावृष्टी करून त्यांचा भार हलका कर।
सर्वांच्या घरी सारखाच नटून थटून तू येतोस खरा,
पण यावर्षी सर्वात आधी त्यांच्या मनोकामना पूर्ण कर।
मला माहित आहे देवा जसा भाव तसा तुझी कृपा आहे,
पण भक्ताचं काही चुकलं असेल तरी त्यांना तू माफ कर।
रोज त्यांच्या यातना बघून जीव कासावीस होतोय सर्वांचा,
करुणामय आहेस तू तर माझ्या बांधवांवरसुद्धा करुणा कर।
मान्य आहे मला देवा तुझ्याकडून जरा जास्तच अपेक्षा ठेवत आहे,
पण बाकी काही मागणं नाही देवा येशील तेंव्हा सर्वप्रथम कोल्हापुरात पदार्पण कर,
माझ्या कोल्हापूरच्या बांधवांवर कृपावृष्टी करून त्यांचा भार हलका कर।

Comments
Post a Comment