Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

महाराष्ट्राचे आराध्य दैवत

आनंदाने नांदत असलेल्या राज्यावर, अचानक सैतानांची टोळी आली । मंदिरं सारी फोडून टाकली, अब्रू स्त्रियांची धुळीला लावली ।। शुक्ल पक्षातील तृतीयेला, एका बालकाचा जन्म झाला । जणू रक्षण कराया ह्या स्वराज्याचं, शिवनेरीवर भगवंत अवतरला ।। पुढे थोडा मोठा झाल्यावर, दादोजींच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले । लहानपणातच शिकता शिकता, हिंदवी स्वराज्याचे धोरण आखले ।। ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीच्या शुभदिनी, रायरेश्वरावर सभा भरवली । वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी, स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली ।। लगेच मुघलांच्या अत्याचारातून, पहिल्या गडाला मुक्त केले । मोठ्या शौर्याने तोरणा जिंकून, स्वराज्याचे तोरण बांधले ।। परकीयांच्या तावडीतून मुक्त होऊन, पुन्हा फडफडू लागला भगवा ।। शत्रूच्या सैन्याचा नाश करायला, मोठ्या युक्तीने आखला गनिमी कावा ।। मात्र अशीच लढाई लढता, पुरंदरी मुरारबाजी कोसळला । अन मिर्झाराजा जयसिंगासह, २३ किल्ल्यांचा तह झाला ।। तहातले गडकिल्ले सोडवण्यासाठी, नवी फौज उभारण्यात आली । मुलाचं लग्न बाजूला ठेवून, तानाजीने प्राणाची आहुती ...

वाल्याचा वाल्मिकी

लुबाडत असे तो सर्वांना दावूनी मारण्याची भीती  अखंड पापाचा असे धनी तो अतिशय निकृष्ठ अशी त्याची नीती  अशीच एकदा वाट आडविली पण निघाले मात्र थोर ऋषि मुनी गळ्यात वीणा हातात चिपळ्या आणि नारायणाची भक्ती सदैव मनी नारायण नारायण म्हणत म्हणत त्यांनी करून दिली जाणीव पापाची दुष्ट अश्या त्या नाराधाम्याला ओळख करून दिली रामनामाची आले डोळे दाटून पश्चातापाने तोंडातून एक शब्द देखील फुटेना आपण साठवून ठेवलेल्या ह्या पापाचा त्याला साधा विचार देखील करवेना लगेच मुनींना करून नमस्कार नामजप त्याने सुरू केला १२ वर्षांच्या तपश्चर्येअंती त्याच्या भक्तीला देव प्रसन्न पावला काय जादू त्या दोन अक्षरांची ज्यांनी वाल्याला वाल्मिकी बनवले पुढे जाऊन ह्याच वाल्मिकी ऋषींना रामायण लिहिण्यास भाग पाडले