आयुष्य फार छोटं आहे,
सकाळचा चहा दोन वेळचं जेवण आणि रात्रीची झोप एवढंच आहे.
दिवसामागून दिवस ढकलले जातात,
लहानपणी ज्या मातीत खेळलो त्या मातीत आज पाय घाण होतात.
लहानपणी जे दिवस चिमण्यामध्ये घालवले तेच आज देखील जातात,
पण आज त्या चिमण्या twitter या टोपणनावाने ओळखल्या जातात.
कामकाजाच बोलाल तर बाकी सर्व ठीक आहे,
फक्त लहानपणी ज्या बोटांनी पेन पकडलं तीच बोट आज कीबोर्ड सोबत busy आहेत.
लहानपणी आपल्या आवडत्या बेंच वर बसण्यासाठी जो गडबड गोंधळ करायचो तो आजही चालतो,
फक्त फरक केवळ शाळेच्या बेंचऐवजी ट्रेन च्या सीट वर दिसून येतो.
कळत सुद्धा नाही कधी धगधगत्या जीवनात आपण लहानाचे मोठे होऊन जातो,
सत्य तर हेच आहे की या आयुष्याच्या जंगलात आपण स्वतःच हरवून बसलेलो असतो.

Comments
Post a Comment