नाव : अंकित
वय : २१ वर्ष
तुझ्यासोबत तुलना करण्याइतकी पात्रता अजून माझ्यात आलेली नाही. तरी तुझ्या असंख्य गुणांच्या खाणीमधून तू मला अर्पण केलेल्या काही गुणांच्या मदतीने तुझ्यासमोर काहीतरी सादर करण्याचा छोटासा प्रयत्न :
तुझ्या पोटाचा हा भला मोठा गाभारा हीच माझी दुनिया होती ।।
नंतर नऊ महिन्याचा झालो, जेव्हा पहिल्यांदाच या जगात प्रवेश केला,
आल्या आल्याच एकदम रडू कोसळलो, कारण तुझा सहवास थोडा दुरावला गेला ।।
चंद्रासारखी हळू हळू होणारी वाढ माझी, आता पहिल्या वाढदिवसावर येऊन थबकली होती,
आता १० ग्रुप जरी साजरे करत असले, तरी तेव्हा वाढदिवसाची पहिली ओळख मात्र तूच करून दिली होती ।।
पुढे पाच वर्षांचा झालो, जेव्हा पहिल्यांदा रडत रडत शाळेत गेलो,
तुझ्या कुशीत वसलेल्या माझ्या त्या गावापासून प्रथमच इतका वेळ लांब गेलो ।।
जसजसा शाळेत रमू लागलो तसतसा मित्र परिवार वाढू लागला,
कळत नकळत का होईना पण हळू हळू तुझा विसर पडू लागला ।।
पंधराव्या वर्षी दहावी आली, मी लावलेले दिवे पाहून तुझाच दिवा पेटत नव्हता,
माझ्या यशस्वीरित्या पास होण्यामागे मात्र खरा तुझ्याच मेहनतीचा हात होता ।।
झाली दहावी लागले निकाल, आता थोडीशी कॉलेज ची हवा लागत चालली होती,
तुझ्यापासून थोडं अजून दुरावलो कारण तुझी जागा घ्यायला आता माझी गर्लफ्रेंड सुदधा आली होती ।।
पाहता पाहता वीस वर्षे पूर्ण झाली, आता मनात पुढचा विचार संचारू लागला,
वीस वर्षांची एज्युकेशनल टूर करून ह्या कॉर्पोरेट जगात प्रथमच मी प्रवेश केला ।।
एकमेकांमधील अंतर आता अजूनच वाढत माझा कॉर्पोरेट प्रवास सुरू झाला,
रोजच्या त्या एकमेकांच्या कटकटीच्या सहवासावाचून आपला जीव मात्र लागेनासा झाला ।।
धगधगत्या जीवनातून कधी वेळ मिळाला की एकवीस वर्ष एकत्र घालवलेले ते सर्व क्षण आठवतात,
तुझ्या सहवासात घालवलेलं बालपण आठवून नकळतच डोळे माझे भरून येतात ।।
शेवटी एकच मागणं मागतो आता आणि शब्द माझे थांबवतो,
तुझा सहवास असाच आयुष्यभर माझ्या सोबत असुदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो ।।

Comments
Post a Comment