दिवस कुठे चांगले चालले होते,
त्यात तुझी ही भर पडली ।
कोण जाणे कोणाची ही पीडा आली,
जी तुझी लागण आमच्या देशाला झाली ।।
नक्की कोणत्या दैत्याचं रूप तुझं,
ज्याने उडविली आमच्या गालावरची खळी ।
मी तर म्हणतो त्या दैत्याहुनी महाक्रूर तू,
जिथे जन्मला तिथेच घेतले ३० हजार बळी ।।
तसं आम्हाला इतिहासच लाभलाय शूरवीरांचा,
म्हणून तुझा सर्वात उत्तम मुकाबला तर आम्हीच केला ।
इतक्या तावातावाने चवताळून आलास खरा,
पण आम्ही तर तुझ्या क्रूरपणाचाही फायदा घेतला ।।
आमच्यावर हसणारी ती फॉरेनर लोकं,
आज पुन्हा राम राम करू लागली।
तुझ्या ह्या क्रूरपणामुळेच आज,
आमची संस्कृती जगभरात पोहोचू लागली।।
अरे ३३ कोटी देवांची भूमी आहे ही,
इथे तुझं वर्चस्व फार वेळ नाही टिकणार ।
मास्क, सॅनिटाईझर आणि कर्फ्युला सोबत घेऊन,
आम्ही सुरक्षितपणे तुझ्याशी लढत राहणार ।।
Comments
Post a Comment