लुबाडत असे तो सर्वांना
दावूनी मारण्याची भीती
अखंड पापाचा असे धनी तो
अतिशय निकृष्ठ अशी त्याची नीती
अशीच एकदा वाट आडविली
पण निघाले मात्र थोर ऋषि मुनी
गळ्यात वीणा हातात चिपळ्या
आणि नारायणाची भक्ती सदैव मनी
नारायण नारायण म्हणत म्हणत
त्यांनी करून दिली जाणीव पापाची
दुष्ट अश्या त्या नाराधाम्याला
ओळख करून दिली रामनामाची
आले डोळे दाटून पश्चातापाने
तोंडातून एक शब्द देखील फुटेना
आपण साठवून ठेवलेल्या ह्या पापाचा
त्याला साधा विचार देखील करवेना
लगेच मुनींना करून नमस्कार
नामजप त्याने सुरू केला
१२ वर्षांच्या तपश्चर्येअंती
त्याच्या भक्तीला देव प्रसन्न पावला
काय जादू त्या दोन अक्षरांची
ज्यांनी वाल्याला वाल्मिकी बनवले
पुढे जाऊन ह्याच वाल्मिकी ऋषींना
रामायण लिहिण्यास भाग पाडले

Comments
Post a Comment