समदं काही ठाव हाय
तरी घरी बसायचं नाव न्हाय ।। धृ ।।
मोठालं संकट आलंय दारी
देवा तूच आता यातून तारी
करी किरपा त्यांच्या बुद्धीवरी
ज्यांना बाहेर पडायची खाज हाय ।। १।।
डाक्टर लढत हायत उपचार करूनि
पोलीस बी हायत उभे काठ्या रोखुनि
तरी कशापाय फिरता इतका हट्ट धरूनि
समदं तुमच्याच रक्षनासाठी चाललेलं हाय ।। २ ।।
सरकारनं लोकडाऊन वाढवला हाय
रोग जिकडं तिकडं पसरतो हाय
आकडा बी दिसनदिस वाढतो हाय
पन तुम्हांसनी घरी बसाया जमत न्हाय ।। ३ ।।
जीवाची पर्वा कदाचित नसल तुम्हांसनी
पन कुटुंबाचा जीव टांगणीला लावूनी
नका भटकू बाहेर असं खुळ्यावानी
अजून बी येळ गेलेली न्हाय ।। ४ ।।
#घरी_रहा #सुरक्षित_रहा 🙏🙏
Comments
Post a Comment