१५ जून २००४ - शाळेचा तो पहिला दिवस...
इतरांसारखाच मी देखील पहिल्यांदा रडत रडतच शाळेत पोहोचलो
आईच्या पदराने नाक डोळे पुसत शाळेच्या बाकावर जाऊन बसलो
पण कोण जाणे शाळेच्या त्या बाकाची जादूच काही निराळी होती
जणू त्या बाकाने पुढची १० वर्षांची गाठ तेंव्हाच हळूच बांधली होती
शाळेतल्या त्या ठरलेल्या बाकावरील गोंधळ आज देखील पाहायला मिळतो
फक्त फरक मात्र त्या बकाऐवजी आज ट्रेनच्या सीटवर दिसून येतो
ट्रेनच्या खिडकीबाहेरचा निसर्ग बघण्यास देखील आता मला सवड नाही
रोजच्या ह्या धगधगत्या जीवनचक्रात माझी शाळा मला आठवत नाही.
हळू हळू शिक्षकांचे धपाटे खात थोडा मोठा झालो
गुडघ्यापर्यंतच्या त्या हाफ चड्डीतून आता मात्र फुलपँटीत आलो
फुलपँटीत आल्याबरोबर हळूच शिंग देखील फुटू लागली
मित्र मैत्रिणी सवंगाड्यांसोबत आता एक गिर्लफ्रेंडसुद्धा सोबत आली
तिला गुपचूप लिहायची ती पत्र तर मी आज देखील रोज लिहितो
फक्त आज ते ऑफिसच्या कामासाठी ई-मेल वरून क्लायंटला पाठवतो
आता ऑफिस आणि डेली रुटीन ह्यापलीकडे दुसरं काही दिसत नाही
रोजच्या ह्या धगधगत्या जीवनचक्रात माझी शाळा मला आठवत नाही.
बघता बघता दहा वर्षांची ही टूर आता संपत आली
उगवलेली शिंग पुन्हा उपटून आता अभ्यास करायची वेळ आली
निरोपसमारंभाच्या वेळी मात्र सर्वांच्या डोळ्यात पाणी येत होतं
आता रोजची हजेरी लावायचं ते हजेरी पुस्तक देखील आम्हाला पाहायला मिळणार नव्हतं
शाळेतील ती दैनंदिन हजेरी तर आज सुद्धा मी रोज लावतो
फक्त फरक मात्र हात वर करण्याऐवजी पंच करण्यात दिसून येतो
ऑफिसच्या ह्या प्रोमोशनच्या स्पर्धेत मला क्षणभर थांबायला वेळ नाही
रोजच्या ह्या धगधगत्या जीवनाचक्रात माझी शाळा मला आठवत नाही.
Comments
Post a Comment